Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

आज अचानक

By: Makarand Behere

November 3, 2014

0 Comments

Categories:

मी त्या दिवशी एकटाच वाचत बसलो होतो हॉल मध्ये; माझ्या बरोबर माझ्या घरी एक मित्र हि राहायला आला होता. तो एक प्रथितयश लेखक; तो मुंबई मध्ये आला की माझ्याकडेच उतरायचा आणि सगळ्यांना संपर्कासाठी माझाच पत्ता द्यायचा.

तर त्या दिवशी मी हॉलमध्ये वाचत बसलो होतो ती कथा की जी माझ्या प्रथितयश मित्राने आधीच वाचली होती आणि त्या कथेच्या मी शेवटापर्यंत आलो होतो. तितक्यात दारावरची बेल वाजली. माझा तो मित्र आतल्या खोलीत होता तो मी खुर्चीतून उठायच्या आत आतून बाहेर आला आणि त्यानेच दर उघडले. मी हातातले ते लिखाण तसेच बाजूला ठेवले…. दारावर एक तरुण उभा होता. त्या तरुणाने विचारले ‘बाबा जोशी इथेच राहतात का?’ मित्र हो म्हणाला तशी त्याने आत येण्याची परवानगी मागितली व विचारले ‘आपणच बाबा जोशी का?’ माझा मित्र मुळातच मिष्कील; खोड्याळ स्वभावाचा असल्याने तो म्हणाला ‘हो मीच बाबा जोशी’; मित्राने त्याला आत येऊ दिले. त्या तरुणाने पाणी मागितले. मित्र आत गेला; त्याने पाणी आणले; त्या तरुणाला दिले; त्या तरुणाने पाणी प्यायले. मग माझ्या मित्राने त्याच्याशी बोलायला सुरवात केली….

तुझे नाव काय?

मी ‘अज्ञात’

‘अज्ञात?’

‘हो’

‘तू तुझ खरं संपूर्ण नाव का सांगत नाहीएस?’

‘नावातच सगळं आहे बाबा जोशी’

‘हे तूच बोलातोयस आणि नाव सांगत नाहीएस’

‘कारण आहे’

‘काय कारण आहे?’

‘बाबा जोशी तुम्ही तुमचा फोटो आत्तापर्यंत कुठेच प्रदर्शित केला नाहीएत?’

‘हो’

‘का?’

‘कारण मला असं वाटत आलं आहे आत्तापर्यंत; की लोकांनी माझ्यापेक्षा माझ्या लिखाणाला ओळखावं; कारण मी प्रसिद्धीपरांगमुख लेखक आहे’

‘तसाच मला वाटतं बाबा जोशी; माझ्यासमोर तुमचा आदर्श आहे मी तुमचा fan आहे; त्यामुळे मलाही असचं वाटतं की लोकांनी माझ्या नावापेक्षा माझ्या लिखाणाला ओळखावं’

‘हुशार आहेस; बर आता मला सांग इथे येण्याचं प्रयोजन काय?’

‘मी आपल्याकडे काही लिखाण पाठवलं होतं; ‘शेवटचं पान’ नावाचं !; ‘

‘हो ते मी वाचलं; फार सुरेख लिहिले आहे; तुझ्याकडे गुण आहेत एक लेखक होण्याचे; फारच सुरेख लिहिले आहे.’

‘मला आपल्याकडून फक्त सुरेख या शब्दाची अपेक्षा नाहीए; आपण मला त्यातलं काय चुक काय बरोबर; काय डावं काय उजवं सांगितलत; आपण एकंदर लिखाणाबाबत एकंदर एकंदर पृथाकतेने बोललात; त्या बाबत आपल मत दिलत तर मला आवडेल’

‘हो; हो; तेच तर मी सांगत होतो तुला की; तु कोकणातील खेड्यातून आलेल्या एका तरुणाची कथा फारच चांगली लिहिली आहेस. विषयाची सुरुवात मध्ये फारच उत्तम साधला आहेस. की एक मुलगा कोकणात राहणारा; खानदानी कुटुंबातला; त्याचे वडील स्वत: शिक्षक आणि लेखक त्यांचा आदर्श; त्यांची छाप त्याच्यावर पडलेली. त्यातूनच त्याला वाचनाची; लेखनाची आवड लागते. तो हळू हळू लिहू लागतो. त्याचं लिखाण स्थानिक वर्तमानपत्रात; साप्ताहीकात; मासिकात प्रसिद्ध होऊ लागतं. तो मैट्रिक होतो. पुढील शिक्षणासाठी शहरात येतो. घरची परिस्थिती चांगली असल्याने पैशाची काही कमतरता नसते; शहरात आल्यावर ज्या कॉलेजमध्ये तो प्रवेश घेतो तिथे त्याला एक नामवंत लेखक लेक्चरर असतात की जे त्याचे आराध्य दैवत; मग तो ठरवतोच की बी.ए. करायचे ते मराठी वाङ्मय घेऊनच. या दरम्यान त्याच्या त्या लेक्चरर ना त्याचे लिखाण आवडत जाते. त्याचं लिखाण कॉलेजच्या मासिकापासून ते शहरातल्या नामवंत वर्तमानपत्रात छापून येऊ लागते.  त्याच दरम्यान त्याचे ते लेक्चरर त्याची ओळख त्याच्याच तोडीस तोड असलेल्या एका तरुणाशी करून देतात की जो शहरात वाढलेला आणि त्याच्या लेखनाला शहराचा बाज आणि विशेष गुण म्हणजे छक्केपंजे खेळणारा … ‘

दोघे ही मित्र होतात. एकत्र अभ्यास; चर्चा वादविवाद; वाचन स्वत:च्या लिखाणापासुन ते दुसऱ्याच्या लिखाणापर्यंत.

दिवसेंदिवस जाऊ लागले. १२ वी; डिग्री पार पडली. दोघांनीही लेखनाच्या क्षेत्राला वाहून घेतलं. दोघांनाही घरची काही कमतरता नव्हती आणि दोघेही प्रगल्भ होते. आपला जो कोकणातला आलेला मुलगा; नायक आहे त्याची पहीली कादंबरी प्रकाशीत झाली; पाठोपाठ आपला जो शहरातला नायक आहे त्याची ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. दोन्ही कादंबऱ्या लोकांनी डोक्यावर घेतल्या पण लोक आपल्या कोकणातल्या नायकाच्या जास्त प्रेमात पडली; आणि लोकांच हे प्रेम दिवसागणिक वाढतच चाललं; आपल्या कोकणातल्या नायकाला मिळणारी प्रसिद्धी पाहुन आपल्या शहरातल्या नायकाच्या मनात असुया निर्माण झाली. तो ठिकठिकाणी आपल्या कोकणातल्या नायकाच्या मार्गात अडथळे आणु लागला; त्रास देऊ लागला; कधी प्रकाशकांचे कान फुंकण्याचे प्रयत्न केले; तर कधी बाजारातल्या आवृत्या नाहीशा करण्याचा प्रयत्न केला. नाना प्रकारे नकळत त्रास देण्यास त्याने सुरुवात केली. यात कमी म्हणुन काय तर आपल्या कोकणातल्या नायकाला स्लो पॉयझनिंग करू लागला. पण आपल्या कोकणातल्या नायकाच्या लेखनात असा काही होतं जे वाचकांना; लोकांना हवं होत. आपल्या कोकणातल्या लेखकाने त्याचं दरम्यान परत दोन कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या; त्याचं दरम्यान आपल्या शहरातल्या नायकाने पण तोडीस तोड दोन कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या पण लोकांनी परत आपल्या कोकणातल्या लेखकालाच डोक्यावर घेतलं. आपला शहरातला नायक आकांक्षा नावाच्या मुलीवर प्रेम करायचा पण ती प्रेम करत होती आपल्या कोकणातल्या नायकावर. त्यामुळे आधीच शहरातल्या नायकाच्या डोळ्यात आपला कोकणातला नायक खुपत होता त्यात आगीत तेल ओतल्यासारखं झालं आणि तेव्हापासून शहरातल्या नायकाने आपल्या कोकणातल्या नायकाला कायमचं संपवायचं अस मनोमन ठरवलं.  त्याचं स्लो पॉयझनिंग चालूच होत. त्याचं दरम्यान आपल्या कोकणातल्या नायकाचं आकांक्षाबरोबर लग्न ही झालं आणि त्यांनी एका पुत्ररत्नाला जन्म ही दिला. याचा शुभशकून असा झाला की सरकारने त्यावेळेस एक पुरस्कार जाहीर केला जो नव लेखकांसाठी आणि त्या पुरस्कारावर त्या नवलेखकांची दारोमदार ठरणार होती; सरकारने तमाम लेखकांमधून फक्त या दोघा लेखकांना आपल्या दोन्ही नायकांना निवडलं. आपल्या शहरातल्या नायकाला कळलं होत की हा पुरस्कार आपल्या मित्रालाच मिळणार आहे. त्याचं स्लो पॉयझनिंग आधीपासूनच चालु होतं. एके दिवशी आपल्या शहरातल्या नायकाने आपल्या कोकणातल्या नायकाला एकांतात माळरानावर भेटण्यासाठी बोलावलं आणि भेट दारूच्या ग्लासात कळसाला पोचल्यावर त्याला विषाचा जास्त डोस देऊन मारून टाकलं. संपलं सगळ संपलं होत. आपल्या शहरातल्या नायकाचा प्रतिस्पर्धी आता कोणीही राहिला नव्हता. सरकारने घोषित केलेला पुरस्कार नाईलाजाने आपल्या शहरातल्या नायकाला मिळाला आणि त्याची यशाची कमान चढतच गेली की शेवटी सरकारने त्याचा पद्मश्री या किताबासाठी विचार केला. ‘

वा वा सुरेख पण काय रे आकांक्षा आणि त्या मुलाचं पुढे काय? ते काहीच लिहील नाहीएस …

‘पुढे आकांक्षा त्या कोकणातल्या लेखकाचा संसार सोडून निघून जाते… ‘

‘का?’

‘कारण ती बद्चलन असते.’

‘वा इंटरेस्टिंग; पण मग त्या मुलाचं काय?’

‘त्या मुलाचा सांभाळ तो लेक्चरर करतो.’

‘का? आता तो लेक्चरर कुठून आला मध्ये’

‘तो लेक्चरर आकांक्षाचा बाप असतो’

‘क्या बात है’ म्हणजे तु कथेच्या उत्कर्षबिंदू पर्यंत आलास….’

‘हो’

‘पण मग हे लिखाण अपूर्ण आहे; कारण तु उत्कर्षबिंदू पण लिहिला नाहीएस आणि शेवटचे पानही; असं का?’

‘मुद्दामुन’

‘मुद्दामुन?’

‘हो’

‘कारण’

‘कारण एकच ही कथा सत्य परिस्थितीवर आधारित आहे.’

‘म्हणजे?’

‘म्हणजे या कथेतला जो लेखकाचा मुलगा आहे तो मी; तो कोकणातला लेखक माझा बाप आणि माझ्या बापाला मारणारे तुम्ही शहरातले नायक बाबा जोशी …’

‘हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय.’

‘गैरसमज वगैरे काही नाही. मला माहित आहे तुम्हीच बाबा जोशी आणि म्हणुनच मी आज तुमचा आणि या कथेचा शेवट करणार आहे; शेवटचं पण लिहिणार आहे.’ असं म्हणत त्याने झोळीतून रीव्हॉंलव्हर काढलं; माझ्या मित्रावर रोखलं. मी आणि माझ्या मित्राने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; मी त्याला म्हणालो ‘अरे तुझा गैरसमज होतोय; हे बाबा जोशी नाहीत.’ तो ऐकायलाच तयार नव्हता; त्याच्यात माझ्यात आणि मित्रात खूप झटापट झाली; त्या विशीतल्या तरुणाने मला साठीच्या म्हाताऱ्याला बाजूला ढकललं आणि माझ्या मित्राच्या मस्तकाचा छेद केला दोन गोळ्यांनी …. तसच हातातलं पिस्तुल झोळीत टाकुन तो थंड रक्ताने निघून गेला… मी सुन्न झालो…. दोन तीन मिनिटे काही सुचेना…

दारावरची बेल वाजली; पोस्टमन आला होता.; मी तशीच मित्रावर चादर घातली. तो झोपलेला दिसेल असा त्याला सावरला…. दार उघडले…

पोस्टमन: बाबा जोशी कोण?

मी: मीच बाबा जोशी …

पोस्टमन: रजिस्टर ए.डी. आहे.

पोस्टमन रजिस्टर ए.डी. देऊन निघून  गेला. ते पत्र मी फोडलं; भारत सरकारकडून आलं होत ते; त्यात लिहिलं होत की ‘कुणी’ ‘अज्ञात’ इसमाने आपल्या एकंदर लेखन कारकिर्दीबद्दल तक्रार केली आहे आणि सोबत त्या बाबतचे पुरावे हि जोडले आहेत; त्या मुळे योग्य टी शहानिशा होईपर्यंत आपल्याला बहाल करण्यात येणारा ‘पद्मश्री’ हा किताब आम्ही राखून ठेवत आहोत.

मी टेबल जवळ खुर्चीवर बसलो; काय कराव सुचत नव्हतं. टेलिफोन दिसला मी रिसिव्हर उचलला आणि नंबर फिरवला….

तिकडून: हेलो कोण बोलतंय ….

मी: बाबा बोलतोय …. तुझा मुलगा आला होता….

 

समाप्त

Leave a Reply

Cateogories

Visits