Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

आयुष्य काय आहे

By: Makarand Behere

December 30, 2014

0 Comments

Categories:

आयुष्य काय आहे हा कूट प्रश्न आहे
जिंकावयास कोडे, जो तो पहात आहे

अजमावतो भविष्या पाहून कुंडली ही,
नशिबास दोष देतो ना गोष्ट एक घडली
प्रारब्ध संचिताचे ओझे उगाच वाहे

हातावरील रेषा, करतील आज किमया
भाळावरील आठी बदलेल हीच दुनिया
स्वप्ने दिव्या दिसाची थाटात रोज पाहे

अपटून बूड झाले ना शष्प ही पलटले
स्वप्नील पावसाळे आले तसेच गेले
जनुकात जन्म वाया ही एक मेख आहे

मकरंद
४१०२२१९२

Leave a Reply