Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

आहेस तू कुठे रे

By: Makarand Behere

December 29, 2014

0 Comments

Categories:

आहेस तू कुठे रे शोधून फार थकलो
रुढी परंपरा अन् संकल्पनेत चकलो

मी जन्मलोय तेंव्हा, तू भेटलास नाही
संस्कार थोपलेले आणि तशा प्रथा ही
थोतांड ज्ञात झाले, तेंव्हा असा हबकलो

भिंतीत बाहुल्यांचा अनुनय तसाच केला
मी वाचल्या कहाण्या अनुभव तुझाच घेण्या
उद्योग हा निकामी, केला कळून चुकलो

नाही कुणी कुणाचा अस्तित्व ना तुझे ही
अग्नी स्वत:च द्यावा जाळावया चिता ही
जन्मास अन् तुला ही, नाहीच मी समजलो

मकरंद
४१०२२१८२

Leave a Reply