Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

कृष्णचांदण्या

By: Makarand Behere

January 7, 2015

0 Comments

Categories:

कृराने ती करणी केली
युगे युगेही लोटून गेली
दुर दुर त्या वाटेवरती
कुणीतरी आहे नजर लाउनी
सावध सावध चोरुन चोरुन
आली क्षितिजी संध्याकाळ
तेजोमय तो रजोकणी त्या
हरवुन बसला काहीकाळ
भासे मजला विश्व असुसले
कुशीत जाया काजळमायी
सुर वेणुचे ऐकु येती
दुर कुठेतरी दिशान्तरी
सुरमई त्या वातावरणी
संध्या झाली सुरमयी
गढुन गेल्या कृष्णचांदण्या
कोणाच्या त्या आठवणी

-मकरंद

Leave a Reply