Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

चारोळी

By: Makarand Behere

November 15, 2014

0 Comments

Categories: ,

मी तुक्याच्या
गाथेसारखा आहे
मला बुडवलात तरी
परत वरती येईन२१०२५०६०

 
येतात जातात वाटसरु
जुनाट पडक्या वाड्यात
म्हणतात अजुन जीव आहे
या भग्न अवशेषात
२१०२३०६०
रजस्वलेच्या नाभीमधुनी
ध्वनी उमटतो सावळा
धावत येतो प्रतीध्वनी तो
नित्य नुतन सोवळाबेहेरे मकरंद
९००२७०८२

गोर्‍या गोर्‍या राधेचा
रोजचा चाळा
दृष्ट लागु नये म्हणुन
लावी गाली टिळा सावळाबेहेरे मकरंद
११०२४०३१

सांजेचे क्षण टिपताना
मी संभोगी साधु होतो
कावळा क्षितिजावरचा
“माणिक” मोती पितोबेहेरे मकरंद
११०२५०११

पुर्वी गौरी छेडताना

सूर विरघळायचे

आता पुर्वीचा
खुप त्रास होतो

41021101
आकार उकार
वेलांट्यामध्ये व्यस्त तू
कधीतरी दोन शब्दांच्या
अवकाशात तरी भेट
४१०२११६०
अव्यक्त तू
माझ्यात व्यक्त होतोस
आणि मी तुला
बिट्विन द लाईनमध्ये मांडतो४१०२०६२

तुझा सुस्कारा
एवढा एब्जर्ड
काय अर्थ लावावा
कळतच नाही४१०२९०४१

तुझ्या नादास लागलो
तर तु ही मला
तुझ्यासारखा
दगड बनवशील४१०२९०२०

आज काल मी
सोवळे करत नाही
कारण मला सोवळ्यात
देव भेटत नाही४१०२८०९२

बनव तू स्वतःला
गिनिपिग देवा
म्हणजे तुला कळावी
व्यथा आमुची४१०२७०४२

तू माझ्या मनाचे प्रश्न विचार
मी तुझ्या मनाची उत्तर देते
बघुया दोघांच्या शर्यतीत
कोणतं मन जिंकतं ते४१०२७००२

कळतोय स्वतःला
जरा जरा मी
खोट्यांच्या जगात
खरा खरा मी४१०२७०६१

यात काहीच
चूक नाही तुझी
मी लोकांना जरा
उशीरा समजतो४१०२७०३१

चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्यम
गुण कर्म विभागश:
माझीच व्याख्या
माझ्या माथी का?४१०२६०१०

न बोलता बरंच काही
व्यक्त असते
रात्र मला
अनुभवत असते४१०२७०१०

लोकं करतात
मेघदूताच वाचन
मी करतो
शिवमहिम्नाच आवर्तन४१०२६०८२

युगे लोटली
तरी शहारा आणतय
तू फिरवत असलेलं
मोरपीस४१०२६०८१

माझी आसवे
रंगहीन आहेत
पण दु:ख मात्र
भलतीच कलरफुल आहेत४१०२३०२०

आज मी तुला
चांदण्यांची गोष्ट सांगतो
फक्त तू मला
गालावरची खळी दे
४१०२२०६२
बरसत्येस
माझ्यातल्या शिशिरावर
तुला वसंताची
चाहूल लागली वाटत
४१०२२०४०
आज काल रात्र जागी असते
सूर्याची वाट पहात
सूर्य उगवल्यावर मात्र
ती तिची सवत:ची राहिलेली नसते४१०२१०४१

माहीत नाही, रात्र
काय करते माव
माझा होतो प्राजक्त
आणि तू चांदण्याचे गाव४१०२१०११

मी जराशी तिच्या गाण्यात
हरकत घेतली
पण त्या हरकतीला
तिची काहीच हरकत नव्हती४१०२१००१

तू फक्त
प्रेम दिलंस
मी माझा
जन्म दिला……३१०२२१२१

इतके दिवस
माझ्या रोमा रोमाची
झडती घेत होतीस
आज श्वासांची ही घेतलीस…..
३१०२०१४२
काही विचारलं की
तुझी उत्तर तयार असतात
खरचं ती किती
खोटं आयुष्य जगत असतात३१०२०१३२

लाईफ ईज द
बिट्वीन दि लाईन
ऑफ
बर्थ अन्ड डेथ३१०२०१३२

स्वप्नात येऊन मला
हवं ते देतेस
प्रत्यक्षात का माझा
द्वेष करतेस३१०२६०११

माणसांची नाती
सावल्यांनी जपली आहेत
जगाला दिसत आहेत, ती
अंधुकशी उरली आहेत
३१०२५०९१
माझ्या मेलेल्या देहाला
जिवंत केलस
काय वसंता
तुझी जिद्द३१०२३०४१

तु भेटायला येत्येस
हे मावळतीचे रंग सांगतात
अन् मला भेटायला येताना
तुझे गाल कसे रंगतात२१०२३०५०

विदेहात तू
विदेहात मी
हरवल्या क्षणाचे
तरी दोन स्वामी२१०२३०४०

तू निघुन गेलीस
माझी वाट पाहुन
आणि प्राजक्ताचा सडा
तुझी व्यथा सांगत होता२१०२२०१२

दररोज रातराणी का?
आज केवडा हवा
नुकत्याच उमलल्या प्राजक्ताला
तुझा मदहोष गंध हवा२१०२२०१२

दोन सावल्यांची मिसळलेली
एक अकृती नदीकाठी
आणि पापणीच्या क्षितिजावर
दुर संध्याकाळ हुरहुरत होती११०२२१७२

स्मृतीतले सगळे
जळून गेले
विस्मृतीत अजून ही
जीवंत आहेत११०२२१५२

देवळाचा गाभारा
शंभोचा सुर घुमण्यासाठी
वांझोटा प्रतिध्वनी उमटतो
आणि विरुन जातो माझ्या पाठी११०२२१४१

देव्हार्‍यातल्या देवाला
अंगणातली तुळस
म्हणजे देवा तुच चढवलास
चाली रीतींचा कळस११०२२१११

लहानपणी दिवसाच्या शेवटी
गोष्ट सांगायची ती आम्हाला
पण तीची गोष्ट सांगीतेल्याशिवाय
माझा एक दिवस नाही गेला११०२२१२०

गाती भुप सकाळी
शेवटाला भैरवी
का कुणी ठरवल्या कधीतरी
चुकीच्या चालीरीती११०२११९२

खुप सोशिक आयुष्य जगलीस
पण तु साफ नाकारतेस
तुला झालेल्या विस्मरणात
आता मला कळतय११०२११९२

माझ्या कवितांवर तुझी
वाह वाह, क्या बात, अशी दाद येते
वाईट हेच वाटत की
तुला फक्त माझी कविता समजते११०२११८१

त्या दिवशी नेहमीच्या
वळणावर आपण भेटलो, पण
परत ओळखीची वळण
लागलीच नाहीत, जसा मी वळलो११०२११७१

तुझ्या ब्लॅक अँड व्हाईट आठवणीत
मी सतत रममाण असतो
त्या कलरफुल होतील कधीतरी
ही वेडी आशा लावून असतो११०२११११

दररोज तुझ्या बद्दल
वहीत लिहितो
आज जरा तुझ्यावर
लिहुन बघतो११०२११७०

“ए ए ए मला चंद्र हवाय”
तू म्हणालीस
अचानक तुझा तोल गेला
आणि अलगद माझ्या मिठीत आलीस११०२०१०३

तुझ्या घराकडे येणार्‍या
वाटेला किती वळण?
माहीत असाव त्यांना
मला, तुझ नागमोडी छळण११०२०१०३

Leave a Reply

Cateogories

Visits