Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

तीनओळी

By: Makarand Behere

November 14, 2014

0 Comments

Categories: ,

तुझी मौनवीणा
गाई मौनसुक्त
सह्स्त्रार्थी

२१०२२१६०

काजळचन्द्रानी
काजळवेळी
काळजा ध्वस्त केले

२१०२२११०

कातीव, कातिल
कलाकुसर
देवाची, तुझ्यारुपी

२१०२२११०

जीवन
अॅक्शनफ्लिकर
मागे न उलटणारा

२१०२१११०

हायकुच
सैरभैर फिरतो
हायकुच्या शोधात

२१०२०१८२

तीन पत्ती
सांगते शेवटी
कटू सत्य “नियती”

२१०२०१७२

खेळ उन सावलीचा
निसर्गाच्या
जांभईचा

२१०२०१७२

लिहायच
फाडायच
हेच कामही विधात्याच

२१०२०१७२

ॐ,
एकच अक्षर
स्वत:ची ओळख असलेलं

२१०२०१६२

जीव व्याकुळ
“भुकेने”
व्यापली “बाराच्या” काट्याने

२१०२०१६२

वेळू बनात
स्वर कल्लोळ
जणू मंत्रघोष

२१०२०१६२

दिवस-रात्र
निसर्गाचा
रिकामा टाईमपास

२१०२०१५२

लिहिले मी
अर्थयुक्त
लोकांनी केला अनर्थ

२१०२०१५२

कावळा
पुतळ्यावर
जीव तलवारीवर

२१०२०१५२

राखही केली
लिलाव माझी
“मेल्यावरही लुट !”

२१०२०१५२

उसासणं, विंधणं
त्यातच पुन्हा
जन्माला येण

२१०२०१५२

तुझी कव
सैल, का? ऐनवेळी
अर्थ हरवलेली

२१०२०१५२

माझा एकटेपणा
कधीच नसतो
एकटा

२१०२०१४२

तुक्या, कबीरा,
तुझा जन्म वाया
मी मागासलेला

२१०२०१४२

मी, वेडा
कुठेही फिरतो
वाटा आणतात घराकडे

२१०२०१४२

भय नाही जगाचे
मी श्वास घेतो
वादळाचे

२१०२०१४२

निर्गुणाच ध्यान
सगुणाने
काही अजून गोंघळलेले

२१०२०१४२

अनेक श्वास
गर्दित
स्वत:ची कथा सांगतात

२१०२०१४२

मी मर्त्य, तसा तु ही
आत्म्याविना
देवत्वाविना

२१०२०१४२

एकाशी लग्न
दुसऱ्याशी टिपरी
हाच गरबा

२१०२०१३२

रिफर टू एक्स
प्लासिबो इफेक्ट
सगळ खोट

२१०२०१३२

जीवन?
भागाकार?
की बिघडलेल प्रमेय?

२१०२०१३२

रामायण
महाभारत
माझच जीवन

२१०२०१०२

तुकयाच्या ज्ञानातला
माझिया मनातला
नास्तिकांच्या नसण्यातला

२१०२०१४०

मीच शोध
मीच शोधक
विस्मृतीत गेलेला

२१०२०११०

आस्तिक ईश्वरासाठी
नास्तिक निरिश्वरासाठी
रिफर टू एक्स

२१०२९०८२

तो खुणावतो
मी ही भुलते
निसर्गच तो

२१०२९०७२

संग्रह छायाचित्रांचा
कृष्णधवल रंगाचा
संघर्ष जगण्याचा

२१०२९०७२

काळाला तोडल

मात्रेला मोडल
ऑफबीट झालो

२१०२९०३२

Leave a Reply

Cateogories

Visits