Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

मजला पहाटवेळी

By: Makarand Behere

December 27, 2014

0 Comments

Categories:

मजला पहाटवेळी, जातोस सोडुनी तू,
तो सूर्य या कपाळी कोरून जा सख्या तू

 

आहे नभात अजुनी, ती शुक्रचांदणी ही
चोरेल ती खळी ही, तुझियाच यामिनीची
धजणार ना कधी ती असता प्रिया इथे तू

 

आहे लपून बसला गगनात शांक राजा
पळवायचा मला रे आहे विचार त्याचा
तो सूर्य सोबतीला देऊन जा प्रिया तू

 

कळतात का बहाणे माझे सख्या तुला रे?
करते तुला विनंती तू थांब साजणा रे
रुसवा धरेन मी ही, गेलास सोडुनी तू

 

मकरंद
४१०२२१५२

Leave a Reply