Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

मला माहित्ये

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला माहित्ये
तू माझा रोज एक अध्याय

वाचत आलायस
आणि माझा जीवनग्रंथ वाचुन

संपवत आलायस…….

काय वाटल तुला, वाचून?

प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य

की एखादी अर्वाचीन कादंबरी
बाबा आदमच्या जमान्यातली
साधर्म्य सांगणारी?

की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना?
की माझ्या जीवनातले frustration सांगणारी,
किंवा तत्वज्ञान सांगणारी एखादी अर्वाचीन

मुक्तछंदातली एब्जर्ड कविता?

प्रत्येक प्रसंग, कसा वाटला तुला घडवलेला?

नवरस निर्मिती ओत प्रोत
भरलेली आढळली की नाही?

की अभिनयाच्या सर्वांगाचा विचार?

एक्शन रिएक्शननी भरलेली वाक्य
जीवनाच्या चढ उतारावरची
सुख दु:खाच्या रसरशीत भावनांनी
भरलेली?

अनेक कलाटण्यांनी, उत्कर्षबिंदु पर्यंत

येउन पोहोचलेली?

काय वाटली तुला?,

शोकांतिका,
प्रहसन, मॉकरी, ब्लॅक कॉमेडी
की निरस, बेचव, अळणी,
कंटाळवाणी, अर्थहीन, कहाणी?

शेवट वाचून आनंद झाला?

भारला गेलास?
की दु:खाने व्याकुळ होऊन रडलास तू?

एखादवेळ कशी ही असो ही
कविता तुला तुझ्या जीवनाशी रिलेटेड
वाटली असेल?

पण….

मला माहित्ये या पैकी तुला काहीही
जाणवले नाहीये…..
कारण वाचकही तूच आहेस
आणि लेखकही तूच आहेस
आणि प्रत्येक लिखाण लिहून संपवताना
आणि ते एखाद्याच्या हाती सुपूर्द
करताना अलिप्तपणे केलेल्या
निस्वार्थ निर्मितीचे लेबलही……तूच आहेस

Leave a Reply

Cateogories

Visits