Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

मला सांगना मी तुझा कोण आहे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला सांगना मी तुझा कोण आहे
कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे
रंगात येऊन दे दाद रसिका
दयेची तुला भिक मी मागताहे

कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या
कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या
उस्फुर्त ती दाद देशी समेला
कधी येती अश्रु सानंद डोळा

कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना
कधी खुण प्रहसनाची पटे या मना
आलाप ताना कधी काही ओळी
जाशील घेउन सवे त्याच सदना

अशी भेट देतो तुला मी रसिका
कधी वृत्त मात्रा कधी छंद, ठेका
कधी ताल, सुरा सवे मुक्त झोका
मानुन घे गोड तू मायबापा

Leave a Reply

Cateogories

Visits