Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

मागतोस काय तू

By: Makarand Behere

December 27, 2014

0 Comments

Categories:

मागतोस काय तू, शशांक तो नभातला
नीज बाळ कौशला, उशीर खूप जाहला

 

शांत शांत वारिया, विसावल्यात सावल्या
रात्र देतसे झुला, निजावयास सानुल्या
नाद सोड तोकडा, प्रहर पुन्हा निनादला

 

चरित्र ग्रंथ तुजवरी ऋषीमुनींस ज्ञात रे
अडून काळ बैसला, तुझ्याच दर्शनास रे
नाम घेत श्वास हा, भवापरेच जाहला

 

तूच चालवी जगा, तुझ्यामुळेच चंद्रमा
भेट तू स्वत:स रे ,करून त्याग संभ्रमा
विश्वराज्य भोगण्या तुझाच जन्म जाहला

 

मकरंद
४१०२२११०

Leave a Reply