Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शेर

By: Makarand Behere

November 14, 2014

0 Comments

Categories: ,

गझलेतल्या व्यथांना सारून तू पुढे जा
छंदात मुक्तीच्या त्या तरशील रे सुखाने

४१०२११२१

भग्नावशेष माझे येता पहावयाला
जीवंत एकदा ना भेटून जा मला हो

४१०२२११३

काय हो खाती कशाशी राजनीती
वंचना मज रोज साध्या भाकरीची

४१०२११२१

मुखवट्यासवे मीच गेलो समोरी
तरी आरशाने मला जाणले की

४१०२११११

बुडाला जसा मोगरा अत्तरी रे
तसा शब्द शोधे स्थिती व्यक्त व्हाया

४१०२११९०

 

दावलेस तू पार्थाला रे विराटरूपा
अंश होय मी त्या विश्वाचा विसरु नको तू

४१०२११४०

एकादशीला बरा भेटशी रे
पिडतात सारेच गजलेत गालिब

४१०२११३०

बरोबरी तू करू नको रे
चितेवरी मी जळून गेलो

४१०२०१०३

धर्मात शोधले मी जाती प्रथेत तुजला
नाही तुझा गुन्हा रे गेलास गोवला तू

४१०२०१७२

दिसते कुठे व्यथा का, शोधे सभोवती मी
दुसरा नसेच किंतू. होईल शेर उमदा

४१०२०१६२

करू नको तू खुशाल बाता पुण्याईच्या
हजार जंतू चिरडत जाशी चालत जाता

४१०२०१५२

कधी कळेना जन्म जाहला माझा बाबा
कुणीतरी कुंडली मांडली कचर्‍यावरती

४१०२०१५२

शेर नंबरी लिहावया मी नाही गालिब
करू नका रे उगा प्रशंसा भलती माझी

४१०२०१४२

 

नशीब माझे लिहावयाला चुकली सटवी
नसेल साधी सखी सुखाने भाग्या मध्ये

४१०२०१४२

मी ग्लासात पाहिलं जेव्हा
तू दारूत पोहत होती४१०२०१२२
प्यायलो ना मी कधी ही हातभट्टी
दु:ख माझे तेवढे ब्रॅंडेड आहे४१०२०१२२
मारली असे उडी अथांग सागरात मी
ओळखी शिवाय भेटल्या खुणा मला तिथे४१०२०१३१
यत्नात निर्मितीच्या असते कुठे अहिंसा
मरतात शुक्रजंतू, तुझियाच निर्मितीला४१०२०१८०
खऱ्याचे करावेस खोटे किती तू
तुझ्या मालकीची जशी न्यायदेवी४१०२९०७२
पांडवानां साथ होती रे तुझी
कौरवांचे राज्य अजुनी चालते४१०२९०५२
तुम्ही अडकला अजून साध्या लगावलीशी
गझल पुन्हांदा लिहून माझी तयार झाली४१०२९०५२
स्वतःहून प्यादे बनलो जरी मी
अता दावतो अश्व चाले कसा तो४१०२९०५२
वर्णू कसा मी दरबार माझा
भोगी कधी मी, योगी कधी मी४१०२८९२
रुपुटक्याला बहुत झाले गजलवासी
लाकडे त्यांच्या चितेला शेर होती४१०२८००२
जीवनाची भीती नको दाखवू मृत्यो मला
मीच सामोरा येत आहे तुला, तू थांब रे४१०२८०४०
प्लांचेट करेन म्हणतो माझ्यावरी स्वतःचे
भेटेल शुद्ध आत्मा, एखादवेळ माझा४१०२७०३२
जगताय लोकशाही, तुमची असो तुम्हाला
राज्यात माझिया ती, खपणार ना जरा ही४१०२७०५०
भरडतो जात्यातुनी त्या, मला जो
सांगतो मी तो कसाई, असावा४१०२६००३
ठरवताना योग्य संज्ञा घोळ झाला
जन्म आणि मरण यांचा झोल झाला४१०२६०४१
मनात जर मी तुझ्याच द्रवलो
कशास तर मग वडास फेरा?४१०२६०२१
तुझी कल्पना करून बघतो
नसेल तुजला जरा कल्पना४१०२६०८०
दाविशी तू स्वप्न आम्हा, रे विधात्या
ठाउके तुज पूर्ण ना ती, व्हायची की४१०२१०२२
आयुष्य यातनांची जाळून ज्योत माझी
करतोय तो विधाता, दररोजची दिवाळी
३१०२०१७२
कोमल सुरात माझी झाली सदैव बंदिश
अभिशाप शुद्धतेचा, जन्मी मला असावा३१०२०१३१
फैलीन असो त्सुनामी, मी वादळात जगतो
अभिनाम बायको हे, माहीत की तुम्हाला३१०२०१०१
बाहेर एक आणि आतून व्यक्त दुसरे
ओठावरी शिव्या अन्, नामस्मरण अनाहत३१०२०१०१
शेरास आपुल्या हो फर्मावातोय जो तो
आलोय खास माझी घेऊन आज शेळी३१०२०१७०
सगुणाशिवाय निर्गुण लाभे कधी कुणाला?
झटतोय मी अजुनी, होऊन तत्वज्ञानी३१०२०१४०
वदलीस तू प्रिये “मी” आहें तुझा कलेजा
तितक्यात काय सांगू ह्रदयी विकार झाला३१०२०१४०
घेतो लिहावयाला मी शेर ताकदीचा
लिहिताच शब्द पहिला, बोरू तुटून जातो३१०२०१४०
म्हटले जरा शिकुया, गझला लिहावयाला
बघुया किती कसा मी कळलो स्वत: स्वत:ला३१०२०१३०
होतीस नूर माझी होता तुझा जहां ही
विरहात आसवांचा मी ताज रोज बांधे३१०२९०९२
तीच माझे कवन, तीच माझी गजल
कां मला काळजी, “व्हायची ना, हजल?”३१०२०१३०
आत्मशुद्धी मी कराया मौन धरले
वार शब्दांचे कराया लोक आले२१०२०१३१

Leave a Reply

Cateogories

Visits