Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

AAROH / आरोह

Release Date: July 19, 2013

0 Comments | Categories:

युनिव्हर्सल म्युझिक आणि गमभन क्रिएशन च्या सहकार्याने, मी स्वत: लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गीतांचा नजराणा आपल्यापुढे ठेवताना अत्यंत आनंद होत आहे, तसं म्हटलं तर “आरोह” हा माझा गीतांचा पहिलाच संच “प्रेम” हि संकल्पना धरून आठ गाणी घेऊन आला आहे, त्यात कधी प्रियकराबद्दलची एकतर्फी वाटणारी रुखरुख, तर कधी मनात असलेली पण जिला कधी पहिले नाही अशी स्वप्नवत ती. तर कधी किनारयावरचा एकल विरह तर कधी तोच विरह मैफिलीत सदर करताना, कधी परत समेट होऊन मिलनासाठी आतुरलेले दोघे तर कधी लाजलेल्या प्रियकराला मिलनासाठी उत्श्रुंखल आर्जव करणारी ती, तर मिलनात बेहोष होऊन आपण स्वत: कुठे आहोत याचे भान नसलेले दोघ, आणि मिलनानंतर सगळ्या चराचरात तिला भासणारा तो, असा हा दर्जेदार प्रवास आहे. हा सांगेतिक प्रवास आपल्याला महाराष्ट्रात, भारतात, आणि जगभरात रेडिओवर ऐकायला मिळेल. हा प्रवास श्री. अप्पा वढावकरांच्या संगीत संयोजनाने एका वेगळ्याच उंचीला गेला आहे, आणि मंदार आपटे, आनंदी जोशी यांच्या स्वप्नील आवाजाने सजला आहे. ह्या प्रवासात आपल्याला सामावून घेताना माझ्याच काही ओळी उधृत कराव्याश्या वाटतात.
“श्वासांचा खेळ, कातर वेळ

कधी विरह, कधी दो जीवांचा मेळ

चांदणचुरा नको, आकाशगंगा ही

फक्त आरोह ऐका

पायाखाली गवसेल स्वर्गही ….”

आरोह …
विश्वापलीकडचा

Album Tracks

  • SAKHYA MALA SAVE TUJYA

  • SUNI SANJ HI SUNI

  • NABHA DHUND JAHALELE

  • SHEJ HI BOLATE LR

  • AAJ KAAL MI

  • HA NAJARA BHARALELA

  • ROJ ROJ MI TULA

  • RAT DIN MANAT MI

  • Buy Now

Leave a Reply

Aanandi Joshi talking about “AAROH”