Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Categories Archives: कविता

November 4, 2014

तुझ्याच झोपडीत रे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

तुझ्याच झोपडीत रे, सख्या मला रहायचे असो कसे गवाक्ष ही, नभास त्या पहायचे नळास धार बारकी, कशीबशीच राहु दे डब्यात धान्य संपले, पुसून ताट चाटु रे सवेच शाल फाटकी, पसारुनी निजायचे पगार ही कमी तुझा, असेल साजणा जरा जपून वापरेन मी, खिसा तुझाच तोकडा अखेर मास संपता,  More...

November 4, 2014

दिवसा मनातलेही बोलावयास भीती

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

दिवसा मनातलेही बोलावयास भीती राती सुखात मजला घोरावयास भीती लग्नात आणला मी मृत्यु घरीच माझ्या सुटकेस मोक्षमंत्रा घोकावयास भीती सटवी म्हणुन झाली ख्यातीच भोवताली पाठी स्तुतीफुलांना घालावयास भीती जयघोष रोज होतो माझ्या घरातल्यांचा माहेरच्या तिच्यांना तोलावयास   More...

November 4, 2014

तुला पाहताना, जरी भासतो मी

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

तुला पाहताना, जरी भासतो मी पुकारे तुला अन्, तिला ऐकतो मी सजवतेस माझा, बिछाना सखे तू तिच्या बाहुपाशी, इथे नाहतो मी मुक्याने मुक्याचे, जरी गूज करशी तिचे श्वास घेतो, तिला बाहतो मी जरी दावशी तू, तुझ्या यौवनाला तिच्या वैभवाला, इथे प्राशतो मी गझल गातसे मी, तुला  More...

November 4, 2014

मी गीत गात आहे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मी गीत गात आहे, माझ्या सख्या, तुझे रे अवचित भेटले मी, गीतात या, मला रे करतोस तू किती ते, कौतुक या छटांचे साकारशी कसे हे, तू भाव या मनाचे लाजून चूर झाले, वाचून भावना रे डोळ्यात मन्मथाच्या, मनसात मी गवसले स्वप्ने कितीक माझी, तू गूज जाणलेले देहास व्यापुनीया,  More...

November 4, 2014

आईच्या गर्भात लाभली

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

आईच्या गर्भात लाभली मजला माझी भाषा अमृताचे स्तन्य जाणवे मजला माझी भाषा माउलीचे अन् तुकयाचे तोय भरतसे भाषा जशी वळवावी तशी वळतसे लवचिक माझी भाषा त्रिविध ध्वनीतील “म” कार आहे सात्विक माझी भाषा विविध लेखकू कवी भूषणांनी नटली माझी भाषा देवनागरी, मोड  More...

Cateogories

Visits